Pune : ससूनमध्ये आज 3 मृत्यू; एकूण कोरोना बळींची संख्या 55

एमपीसी न्यूज : पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. ससून रुग्णालयात आज ( रविवारी) आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ससूनमधील मृतांचा आकडा आता 55  वर पोहोचला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंताही वाढत आहे.

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाच्या कोविड नोडल ऑफिसर यांनी ही माहिती दिली. आज (रविवारी) सायंकाळी पाच वाजता ससून रुग्णाल्याकडून जारी केलेल्या माहितीनुसार ससून रुग्णालयात सध्या 110 कोरोनाबाधित व 103 कोरोना संशयित रुग्ण उपचार घेत आहेत.

यामध्ये गंभीर असलेल्या 5 रुग्णांना व्हेंटिलेटरवर तर 20  रुग्णांना व्हेंटीलेटरशिवाय उपचार करण्यात येत आहेत. आज 202  रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर तिघांचा मृत्यू झाला. यामुळे ससूनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 55  इतकी झाली आहे.

समाधानकारक बाब म्हणजे ससूनमध्ये ‘आयसीयू’त उपचार घेत असलेल्या १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आयसीयूतून डाऊन आयसीयूत दाखल करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.