Pune: जगातील कोरोनाबाधितांपैकी 31 टक्के एकट्या अमेरिकेत तर भारतात 0.62 टक्के

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 21 लाख 83 हजार 148 इतकी झाली आहे. देशनिहाय या कोरोनाबाधितांची विभागणी केली तर सर्वाधिक कोरोनाबाधित हे अमेरिकेत झाल्याचे दिसून येते. जगातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 31 टक्के रुग्ण एकट्या अमेरिकेत असल्याचे दिसून येते. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग हा अमेरिका व युरोपमध्ये पाहायला मिळतो. जगातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 0.62 टक्के कोरोनाबाधित हे भारतात नोंदवले गेले आहेत.

कोरोनाची सर्वाधिक लागण झालेल्या 10 देशांमध्ये अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम, चीन, इराण, टर्की, बेल्जियम या देशांचा समावेश आहे. एकूण कोरोनाबाधितांपैकी 77 टक्के रुग्ण हे या दहा देशांमधील आहेत. या दहा देशांमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या व टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.

  1. अमेरिका – 6,78,144 (31.09%)
  2. स्पेन – 1,84,948 (8.48%)
  3. इटली – 1,68,941 (7.75%)
  4. फ्रान्स – 1,65,027 (7.57%)
  5. जर्मनी – 1,37,698 (6.32%)
  6. यू. के. – 1,03,093 (4.72%)
  7. चीन – 82,341 (3.79%)
  8. इराण – 77,995 (3.57%)
  9. टर्की – 74,193 (3.40%) 
  10. बेल्जियम – 34,809 (1.59%)

अमेरिका आणि युरोपातील कोरोना संसर्गाची तुलना केली तर युरोपमध्ये अमेरिकेच्या तुलनेत जास्त कोरोनाबाधित रुग्ण दिसतात. अमेरिकेत 6 लाख 78 हजार 144 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 34 हजार 617 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे हे प्रमाण 5.11 टक्के आहे. युरोपमध्ये एकूण 10 लाख 15 हजार 507 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 92 हजार 224 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे हे प्रमाण 9.08 इतके आहे. म्हणजेच अमेरिकेपेक्षा युरोपमध्ये कोरोनाचा मृत्यूदर जास्त असल्याचे दिसून येत आहे.

भारतात 13 हजार 430 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 448 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे हा मृत्यूदर 3.34 आहे. जगातील अन्य देशांच्या कोरोना मृत्यूदरांपेक्षा तो बऱ्यापैकी कमी असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात एकूण 3 हजार 202 कोरोनाबाधितांची नोंद असून त्यापैकी 194 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच मृत्यूदर 6.06 टक्के आहे. हा जास्त मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान महाराष्ट्र शासनापुढे असून त्यासाठी शासनाने तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.