Pune : आंबेगाव तालुक्यातील 312 जण आपापल्या जिल्ह्यात रवाना

Pune: 312 migrant workers from Ambegaon taluka left for their respective districts

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे आंबेगाव तालुक्यात अडकून पडलेल्या कामगार व मजूरांना सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी आणि संपूर्ण तालुका महसूल प्रशासनाने विशेष नियोजन करून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात रवाना केले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा आणि उप विभागीय स्तरावर नियोजन करण्यात येत आहे.

आंबेगाव तालुक्यात अडकलेल्या 312 प्रवाशांना 11 एसटी बसमधून त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले.

रविवारी (दि. 10) उशिरापर्यंत नागरिक रवाना करण्यात येत होते. शेवटची बस रात्री 11 वाजता मार्गस्थ करण्यात आली. आवश्यकतेनुसार आणखी बस सोडण्यात येणार असल्याचे सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे.

या मजुरांना रवाना करताना  त्यांचे थर्मल स्क्रीनिंग तसेच प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क वापरणे या बाबींचा अवलंब करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.