Pune: जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 32 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Pune: 32 corona patients died in a single day शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी मोठी वाढ झाली. 1147 नवीन रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

एमपीसी न्यूज- पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. एकीकडे रुग्णसंख्या सापडण्याचे प्रमाण मोठे असतानाच आता मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी (दि.8) 32 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या अहवालात ही माहिती नोंद केलेली आहे. पुण्यातील ही एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. पुणे शहरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 770 इतकी झाली आहे.

मृत्युमुखी पडलेल्या 32 जणांमध्ये 19 जण पुणे महापालिका हद्दीतील आहेत. पिंपरी-चिंचवड हद्दीतील 6, पुण्याच्या ग्रामीण भागातील 1 आणि पुणे जिल्ह्याबाहेरील सहा रुग्ण आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी मोठी वाढ झाली. 1147 नवीन रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाचे प्रमाणही वाढले आहे.

बुधवारी एका दिवसात तब्बल 587 रूग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. पुण्यात आतापर्यंत 14998 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.