Pune: 323 रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे- हेमंत रासने

Pune: 323 road width proposal Pushed forward says standing committee chairman Hemant Rasane

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील बांधकाम व्यवसायाला आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेने सहा मीटर रुंदीचे ३२३ रस्ते नऊ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव पुढे घेतला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

रस्त्यांच्या या प्रस्तावाबाबत विरोधी पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय करण्यात येणार आहे. राज्य शासनातर्फे २०१७ मध्ये विकास आराखडा अंतिम करताना किमान नऊ मीटर रुंदी असलेल्या रस्त्यांलगतच्या इमारतींच्या बांधकामांनाच ‘टीडीआर’चा वापर करण्याची अट घातली आहे.

त्यामुळे शहरातील सहा मीटर रुंद रस्त्यांवरील इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. जवळपास दोन हजार किलोमीटर एकूण लांबी असलेले अनेक रस्त्यांलगतचा पुनर्विकास रखडला आहे.

पुणे महापालिका प्रशासनाने सहा मीटर रुंदीचे पहिल्या टप्प्यात ३२३ रस्ते शोधले आहेत. त्यांची एकूण लांबी ही १०३ किलोमीटर आहे. या प्रस्तावाला विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

त्यांचा विरोध दूर केल्यानंतरच हा विषय मंजूर करण्यात येणार आहे. दरम्यान, बांधकाम क्षेत्रात सध्या अभूतपूर्व अशी मंदी आहे. आधीच नोटबंदी, जीएसटी, रेरा या लागोपाठ घेण्यात आलेल्या निर्णयामुळे घरांना उठाव नाही.

त्यात आता मागील 4 महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे हाहाकार मजला आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी 323 रुंदीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनातर्फे स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यावर आता पुढील बैठकीत चर्चा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.