Pune: ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त 325 खाटा, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Pune: 325 oxygen-rich beds in Sassoon General Hospital, District Collector naval kishor ram's information ऑक्सिजन पाइपलाइन, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टॅंक, स्थापत्य दुरूस्त्या, विद्युत दुरूस्त्या, सीसीटीव्ही कॅमेरे आदी कामे तातडीने करण्यात येत आहेत.

0

एमपीसी न्यूज – ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त 325 खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्हाधिकारी राम यांनी रविवारी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची पाहणी केली. यामध्ये ऑक्सिजन पाइपलाइन, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टॅंक, स्थापत्य दुरूस्त्या, विद्युत दुरूस्त्या, सीसीटीव्ही कॅमेरे आदी कामे तातडीने करण्यात येत आहेत.

पाहाणीच्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, विभाग प्रमुख व प्रा. आरती किणीकर, कार्यकारी अभियंता तेलंग यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

ससून रुग्णालयात 4 ऑगस्ट पर्यंत 175 ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील तर उर्वरित खाटा लवकरच तयार होतील.

ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के खाटा कोविडसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

ससून रुग्णालयातील इन्फोसिस, डेव्हिड ससून, पेडियाट्रीक, जेकब ससून या वॉर्डात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कामासाठी 4 कोटी 2 लाख रुपये खर्च येणार असल्याचे कार्यकारी अभियंता तेलंग म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like