Pune : विभागात 34 हजार 384  क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 788 क्विंटल भाजीपाल्याची आवक – विभागीय आयुक्त

एमपीसी न्यूज – सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे  34   हजार  384   क्विंटल अन्नधान्याची तर   10 हजार  788   क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 3 हजार 699  क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक  7  हजार  191  क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

 पुणे विभागात 11 मे 2020 रोजी 101.52 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.76 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 19 हजार 150 स्थलांतरित मजुरांची सोय 85 हजार 785 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 129 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68  कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 18 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 215 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 19 हजार 150 स्थलांतरित मजूर असून 85 हजार 785 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.