Pune : हातभट्टीची 350 लिटर दारू जप्त

एमपीसी न्यूज- बकरी ईद निमित्त बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग सुरु असताना एका कारमधून १७ हजार ५०० रुपये किमतीची ३५० लिटर देशी दारू जप्त करण्यात आली. सोमवारी, गंगाधाम रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी कृपाल किशनदेव शर्मा (वय 26, रा. शेलार मळा कात्रज) याला अटक करण्यात आली आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे व पोलीस शिपाई पुजारी हे गंगाधाम रस्त्यावर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक संशयीत कार कोंढव्याच्या दिशेने जाताना दिसली. या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कारवरील चालकाने कार न थांबवता पुढे नेली. पोलिसांनी तिचा पाठलाग करून थोडयाच अंतरावर कार थांबवली असता त्यामध्ये वेगवेगळया रंगाच्या प्लॅस्टीकच्या कॅनमध्ये 17 हजार 500 रुपये किमतीची 350 लिटर हातभट्टीची दारु आढळून आली.

पोलिसांनी सर्व कॅन आणि दारूची वाहतूक करणारी झेन मारुती कार (एमएच -14-एच -8256) असा एकूण १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक पावसे, पोलीस उपनिरीक्षक काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार चिप्पा, पोलीस शिपाई पुजारी, मोरे, शिंदे, महांगडे, लोधा, कुलकर्णी, सोरटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.