Pune : सराईत गुन्हेगाराकडून 37 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – दिघीतील जुन्या जकात नाक्याजवळून सराईत गुन्हेगाराकडून 37 किलो 140 ग्रॅम (सुमारे 5 लाख 57 हजार रुपये किमतीचा) गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (8 जुलै) दुपारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

रमेश सोपान जाधव (वय-32, रा.मु.पो.केळगाव (आळंदी) ता.खेड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी विभागाचे पथक दिघी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना जुन्या जकात नाक्याजवळ संशयास्पद अवस्थेत स्कॉर्पिओ गाडी उभी असल्याचे आढळले. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 37 किलो गांजा आढळला. पोलिसांनी आरोपी रमेश जाधव याच्यावर गुन्ह दाखल केला आहे. त्याच्यावर यापुर्वीही 2016 साली गांजा बाळगल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.