Pune :  विभागात 38,584 रुग्ण कोरोनामुक्त ; 24,444 सक्रिय रुग्ण – डॉ. दीपक म्हैसेकर

38,584 patients corona free in the Pune Division ; 24,444 active patients - Dr. Deepak Mhaisekar : पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.44 टक्के

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 64 हजार 914 झाली आहे. पैकी 38 हजार 584  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात 24 हजार 444 ॲक्टीव रुग्ण आहेत, अशी माहिती  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी  दिली.  

डॉ.  म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागात 1,886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 786  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.44 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.91  टक्के इतके आहे.

पुणे जिल्हयात 53 हजार 450 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 32  हजार 975 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 127 आहे.

यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 13 हजार 235, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 41 व पुणे कॅन्टोंन्मेंट 237, खडकी विभागातील 47 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 475, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  92  रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्हयात  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 999, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 206  व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 23, ग्रामीण क्षेत्रातील 62, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  29 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 556 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.69 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.52  टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 239 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 404, सातारा जिल्ह्यात 273, सोलापूर जिल्ह्यात 362, सांगली जिल्ह्यात  64 तर कोल्हापूर जिल्ह्यात 136 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2  हजार 551  रुग्ण असून 1  हजार 307  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 165 आहे. कोरोनाबाधित एकूण 79  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील  5 हजार 627 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 869  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  2  हजार 385  आहे. कोरोना बाधित एकूण 373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 9 रुग्ण असून 434 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 542 आहे. कोरोना बाधित एकूण 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 2  हजार 277 कोरोना बाधीत रुग्ण असून 999  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 225 आहे. कोरोना बाधित एकूण 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण  3 लाख  15 हजार  298  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी   3 लाख 12 हजार 368  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 930 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 46  हजार 730 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.