Pune : दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू, 104 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज : पुणे शहरात दिवसभरात 104  रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पुण्यात एकूण पाॅझिटिव्ह रूग्णसंख्या 876 इतकी झाली आहे. तर 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या पुण्यातील महापालिक रुग्णालयांसह विविध खासगी  रुग्णालयांमध्ये 484 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वाधिक 176  ससूनमध्ये, 163  रुग्ण सिबॉयसिस रुग्णालयात, तर नायडू रुग्णालयात 90 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच महापालिका आणि अन्य खासगी रुग्णालयातही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या 3  रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.  दिवसभरात 4  रुग्णांनाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाच्या बळींची संख्या 56   इतकी झाली आहे.

डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 667  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाचा संसर्ग झालेले 8  रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 36  क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका हद्दीतील रुग्णालयांमध्ये 605 तर ससूनमध्ये 167 अशा एकूण 772 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये 594 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत १२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.