Pune : पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ‘च्या 40 विद्यार्थ्यांचा ‘ऍडोब चॅम्पियनशिप’ मध्ये सहभाग

कृष्णा सुतारची अमेरिकेतील स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्टस् ‘च्या 40 विद्यार्थ्यांनी ‘ऍडोब चॅम्पियनशिप ‘स्पर्धेत भाग घेतला . फोटोशॉप ट्रेनिंग प्रोग्रॅम अंतर्गत झालेल्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . यातील कु . कृष्णा सुतार या विद्यार्थिनीला सर्वाधिक गुण मिळवून ती आता या चॅम्पियनशिप च्या पुढील टप्प्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे . ही स्पर्धा 2020 मध्ये अमेरिकेत होणार आहे.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम आणि कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्टस् चे प्राचार्य डॉ ऋषी आचार्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . यावेळी एस बी एच इनामदार ,झुबेर शेख ,हर्षद सांगळे इत्यादी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.