Pune : नदी स्वच्छता अभियानात 4097 नागरिकांचा सहभाग

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2020 – मुठाई – मुळाई महोत्सव अंतर्गत पुणे महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या नदी स्वच्छता अभियानात 4 हजार 97 नागरिकांनी सहभाग घेतला.

28 नोव्हेंबर हा देशभरात भारतीय नदी दिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक 23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2019 हा संपूर्ण सप्ताह पुणे महापालिका मुठाई – मुळाई महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. या काळात स्वच्छता व जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले.

दि. 28 नोव्हेंबर रोजी एस. एम. जोशी घाट या ठिकाणी नदीची पूजा करून दिवे लावून भारतीय नदी दिन साजरा करण्यात आला. दि. 29 नोव्हेंबर रोजी मिस आणि मिसेस माय अर्थ 2019 एन्व्हर्नमेंटल फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. दि. 30 नोव्हेंबर रोजी पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयामार्फत संपूर्ण मुळा – मुठाई नदी आणि शहरातील इतर काही नाले – तलाव या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

4 हजार 97 नागरिक, स्वयंसेवक, शाळा – महाविद्यालयालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुमारे 17 हजार 776 किलो कचरा गोळा केला. नदी बद्दल विद्यार्थ्यांना आपुलकी निर्माण होत असून, स्वच्छता करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. पुणे महापालिका आणि पुणेकर मिळून मुठा – मुळाई नदीला पुन्हा एकदा जिवंत व प्रदूषणविरहित करणार आहेत, असा विश्वास घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.