Pune : निजामुद्दीन येथील मेळाव्यातील 46 पैकी 42 जण ‘कोरोना’ निगेटिव्ह -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – दिल्लीतील निजामुद्दीन मरकज मेळाव्यात सहभागी झालेल्या ४६ जणांचे स्त्राव नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवले होते. यात 46 पैकी 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उरलेल्या चार जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

दिल्लीतील मेळाव्यामुळे पुणे शहरातील कोरोनाचे संकट आणखी वाढले आहे. सात कोरोनाचे रुग्ण बरे झाले असताना आता ही संख्या वाढताना दिसत आहे. उपनगरातून नागरिक मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या कार्यक्रमात गेले होते. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील 136 जणांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे जिल्हा प्रशासनाने तातडीने हे नागरिक शोधून काढले. त्याबद्दल सर्वस्तरातून प्रशासनाचे अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.