Pune : घरफोडी करून 44 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद फ्लॅटच्या टॉयलेटच्या खिडकीवाटे प्रवेश करून तब्बल 44 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि 3) ते शनिवारी (दि. 5) यादरम्यान कर्वेनगर येथील लबडे रेसिडेन्सी येथे घडली आहे.

याप्रकरणी प्रथमेश लबडे (वय 27) राहणार कर्वेनगर यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश यांचा राहता फ्लॅट गुरुवार पासून दोन दिवस बंद होता. यादरम्यान त्यांच्या बंद घराच्या टॉयलेटची खिडकी उचकटून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. आणि बेडरूममधील कपाटात असलेली एक रिवॉल्वर, कॅमेरा तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा तब्बल 44 लाख 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वारजे पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.