Pune – तुकाराम मुंढेना पुन्हा धमकीचे पत्र

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र आले आहे. याबाबतची माहिती मुंढे यांनी स्वतः फोन करून पोलिसांना कळवली. यापूर्वीच्या पत्रात नाव असलेल्या भुजंगराव मोहिते याच व्यक्तीच्या नावाने हे पत्र पाठवण्यात आले आहे.

पीएमपी प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या पासमध्ये केलेली दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी सुखसागरनगर येथील एका ज्येष्ठ नागरिकाने थेट तुकाराम मुंढे यांनाच धमकीचे पत्र पाठवले होते. आज आलेल्या पत्रात देखील अशाच प्रकारची धमकी देण्यात आलेली आहे. मागील पत्रापेक्षा आज पाठवलेल्या पत्रातील भाषा ही अधिक तीव्र स्वरूपाची असून मुंढे यांच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात देण्यात आली आहे. मुंढे यांच्या कुटुंबातील चार-पाच व्यक्ती पूर्णपणे नाहीश्या करण्याची भाषा यात करण्यात आली असून संपूर्ण शहराला हादरवणाऱ्या जोशी, अभ्यंकर, बाफना, हेगडे हत्याकांडाचाही उल्लेख यात करण्यात आला आहे.

हिंदी आणि मराठी मिश्रित भाषेतील हे पत्र पोस्टाद्वारे पीएमपीएमएल कार्यालयात पोचले. या विरोधात पीएमपीएमएल प्रशासनाने स्वारगेट पोलीस स्थानक आणि पुणे पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे.

"Letter"

"Letter

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.