Corona Update: पुणे विभागात सक्रिय रुग्ण 4965 तर 9552 रुग्ण झाले बरे

Pune: 4965 active patients in Pune division; 9 thousand 552 patients were cured from corona आज (रविवारी, दि. 14) दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, कालच्या (शनिवार, दि. 13) बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 561 ने वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूज- पुणे विभागातील 9 हजार 552 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टिव रुग्ण 4 हजार 965 आहे.

विभागात कोरोनाबाधीत एकूण 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 262 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.85 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

आज (रविवारी, दि. 14) दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, कालच्या (शनिवार, दि. 13) बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 561 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 480, सातारा जिल्ह्यात 8, सोलापूर जिल्ह्यात 47, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 10 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 1 लाख 17 हजार 920 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 13 हजार 628 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

तर 4 हजार 292 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 98 हजार 178 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 15 हजार 198 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

पुणे जिल्हा- पुणे जिल्हयातील 11 हजार 877 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 457 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 931 आहे.

कोरोनाबाधित एकूण 489 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 247 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.79 टक्के आहे.

सातारा जिल्हा– सातारा जिल्हयातील 726 कोरोना बाधीत रुग्ण असून 499 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 196 आहे. कोरोनाबाधित एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा- सोलापूर जिल्हयातील 1 हजार 659 कोरोना बाधीत रुग्ण असून 866 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 647 आहे. कोरोना बाधित एकूण 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा- सांगली जिल्हयातील 216 कोरोना बाधीत रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 95 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा- कोल्हापूर जिल्हयातील 720 कोरोना बाधीत रुग्ण असून 616 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 96 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.