Pune : अन्नधान्य-जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून 5 लाखाचा निधी वापरावा

स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय सदस्यांकडून ठराव मंजूर

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून 5 लाख रुपये अन्नधान्य – जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी वापरू द्यावे, असा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वोपक्षीय सदस्यांनी मंजूर केला.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली. शासनाने या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर तातडीने त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  कोरोना या रोगामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. पुणे शहरातील गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंसाठी अतोनात हाल होत आहे. यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास लोकडाऊन वाढू शकते.

संचारबंदी लागू होऊन 21 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तर दि. 3 मे 2020 पर्यंत आणखी संचारबंदी कायम करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोरगरीब, हातावरच पोट असणाऱ्या नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी पुणे महापालिकेच्या नागरसेवकांना 5 लाख रुपये वॉर्डस्तरीय निधी वापरू द्यावा, असे प्रस्तावात म्हटले आहे.

या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. या ठरावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता असेल, असेही सर्वोपक्षीय नेत्यांनी म्हटले आहे. या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, स्थायी समिती सदस्य महेंद्र पठारे, बाळा ओसवाल, दीपक पोटे, नंदा लोणकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.