Pune : भिगवण येथे आणखी 5 गावठी पिस्तूल हस्तगत;एकूण 9 पिस्तूल व 11 जिवंत काडतुसे जप्त

5 more pistols seized at Bhigwan; total 9 pistols and 11 live cartridges seized :पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक, भिगवण पोलिस स्टेशन यांची संयुक्त कारवाई

एमपीसीन्यूज : मागील आठवड्यामध्ये भिगवण येथे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व भिगवण पोलिस स्टेशन यांनी कारवाई करून तीन सराईतांकडून चार गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे ताब्यात घेतली होती.  ही  पिस्तूल त्यांनी विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून आणखी पाच गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

मागील आठवड्यामध्ये भिगवण येथे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व भिगवण पोलिस स्टेशन यांनी कारवाई करून तीन सराईतांकडून चार गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे ताब्यात घेतली होती. हि गावठी पिस्तूल त्यांनी विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास  आल्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना पुढील तपासासाठी विशेष पथक तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व भिगवण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख व इतर कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

या पथकाने अधिक चौकशी करून ताब्यात घेतलेल्या तीन सराईत गुन्हेगारांकडून आणखी पाच गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

त्यामुळे या कारवाईत एकूण एकूण 9  गावठी पिस्तूल व 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे , पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख सहाय्यक फौजदार विश्वास खरात, किरण पांढरे, विजय कांचन, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, अमोल शेडगे, धीरज जाधव, मंगेश भगत, लक्ष्मण राऊत, अरुण पवार यांचा संयुक्त पथकाने ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.