Pune: मोक्का, खून, दरोड्यातील 5 कुख्यात कैदी येरवडा कारागृहातून पळाले

Pune: 5 notorious prisoners of Mocca, murder, robbery escaped from Yerawada Jail पळून गेलेल्या कैदींवर मोक्कासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे कैदी पळून गेल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

एमपीसी न्यूज- पुण्यातील येरवडा कारागृहातून तात्पुरत्या इमारतीतून पाच कैद्यांनी पलायन केले आहे. बुधवारी मध्यरात्री खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला आहे.

देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम कांबळे आणि सनी टायरन पिंटो असे कारागृहातून पळून गेलेल्या कुख्यात आरोपींची नावे आहेत.

नवीन इमारतीच्या खोली क्रमांक 5 मधील खिडकीचे गज कापून हे आरोपी पहाटे पळाले. पळून गेलेल्या कैदींवर मोक्कासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे कैदी पळून गेल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. यांच्या शोधासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.