Pune : विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लस दिल्यानंतर मुलांना उलट्याचा त्रास

5 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

1,017
एमपीसी न्यूज –  विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लस दिल्यानंतर  मुलांना उलट्याचा त्रास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट देखील करण्यात आले आहे.
HB_POST_INPOST_R_A
ही घटना पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका शाळेमध्ये आज मंगळवारी(दि.4)घडली.
मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील दत्तवाडी परिसरातील शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे.सध्या संपूर्ण देशात रुबेला आणि गोवरच्या नायनाटासाठी देशव्यापी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र या लसीचा काही विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याच्या घटना उघडकिस येत आहेत. पुण्यातही अशाच प्रकारची एक घटना आज उघडकीस आली आहे.

पुण्यातील दत्तवाडी परिसरात असलेल्या एका खासगी शाळेतील काही विद्यार्थ्यांना आज सकाळी हे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर थोड्या वेळाने यातील काही विद्यार्थ्यांना उलट्या झाला आणि त्रास होऊ लागला. यामुळे 5 विद्यार्थीनी आणि एका विद्यार्थ्यला दत्तवाडी परिसरातील ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आले. या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत.
जनता वसाहत परिसरातील एका मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या पिंकी पवार (वय10) या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला दोन दिवसांपूर्वी लस देण्यात आली होती. त्यानंतर या मुलीलालही त्रास झाल्यामुळे तिला ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलीच्या अंगावर 10 गाठी आल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.
दरम्यान याप्रकरणी आम्ही लसीकरण अधिकारी असलेल्या परिमल देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, आज सकाळी लस देण्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी काही खाल्ले नसल्यामुळे त्यांना त्रास जाणवू लागला असल्याचे सांगितले. या सर्व मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: