Pune : शहरात आज कोरोनाचे 5 बळी ; 106 नवीन रुग्णांची वाढ

एमपीसीन्यूज – कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या 106 झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 174 जणांचा बळी गेला आहे. 144 रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी ही माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिली आहे.

सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळून असलेल्या क्रिटिकल रुग्णांची संख्या 132  आहे. त्यातील 33  रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 3,093 आणि अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1,289, एकूण मृत्यू 174 झाले आहेत. आजपर्यंत एकूण डिस्चार्ज 1,630. आज केलेल्या स्वॅब तपासण्या1,652

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह  रुग्णांमध्ये  डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-2759 आणि ससूनमध्ये 334  रुग्ण आहेत.  आजपर्यंत एकूण 1630  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तर, आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी तब्बल 1652 आहे.

घोरपडे पेठेतील 39 वर्षीय पुरुषाचा आणि येरवड्यातील 60 वर्षीय महिलेचा व 80 वर्षीय पुरुषाचा वायसीएम हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 75 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 64 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. यामध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. पुणे जिल्हयातील 3 हजार 490 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 हजार 702 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 603 आहे. कोरोनाबाधित एकूण 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 133 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.