Pune : ‘कोविड-19’चा फैलाव रोखण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून 50 लाखांचा निधी

एमपीसी न्यूज – वडगावशेरी मतदारसंघामध्ये आमदार सुनील टिंगरे यांनी कोविड-19 या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यंत्रसामुग्री साहित्य व वैद्यकीय उपकरणे खरेदी करीता संबंधित यंत्रनेला रुपये 50 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहे. त्यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक कोटी, खासदार गिरीश बापट यांनी 50 लाख, तर आता सुनील टिंगरे यांनीही 50 लाख रुपये निधी दिला आहे. पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे.

वडगावशेरी मतदारसंघात कोरोनामुळे संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व प्रसार नियंत्रण करण्यासाठी सन 2019 – 2020 व 2020 – 2021 उपाययोजना व उपाय करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि सुविधा याबाबत औषधी खरेदी करण्यात यावी, असे आवाहन आमदार सुनील टिंगरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.