Pune: कोरोना रुग्णांची संभाव्य वाढ पाहता पुण्यात आणखी 50 अ‍ॅम्ब्युलन्स घेण्याचे नियोजन

Pune: 50 more ambulances will be taken in Pune considering the possible increase in the number of corona patients शहरात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे.

एमपीसी न्यूज- पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचबरोबर या रुग्णांची ने-आण करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सचीही मागणी वाढत आहे. सध्या पुणे महानगरपालिकेकडे स्वतःच्या 54 अ‍ॅम्ब्युलन्स आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 58 अशा एकूण 112 अ‍ॅम्ब्युलन्स कोव्हिड-19 साठी कार्यरत आहेत. त्याचबरोबर कोव्हिड रुग्णांवरील अंत्यसंस्कारासाठी 6 अ‍ॅम्ब्युलन्स आणि 2 अ‍ॅम्ब्युलन्स या इतर रुग्णांवरील अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जात आहेत.

शहरात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. गंभीर रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रसंगी आणखी अ‍ॅम्ब्युलन्सची गरज भासणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडून आणखी 50 अ‍ॅम्ब्युलन्स खरेदी करण्याचे नियोजन केले आहे.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20668 पर्यंत पोहोचली आहे. यातील 12689 जण बरे झाले आहेत. तर 703 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 7276 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील 385 रुग्ण हे गंभीर आहेत. त्यातील 56 जण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.