Pune : हॉटस्पॉटमधील 51.05 टक्के नागरिकांना होऊन गेला कोरोना; मात्र समजलाही नाही

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च या संस्थेने 20 जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण केले आहे. : 51.05 citizens in the hotspot were corona; But did not understand

एमपीसीन्यूज : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील 51.05 टक्के नागरिकांमध्ये कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एंटीबॉडीज आढळून आल्या असल्याचे सिरॅलॉजिकल सर्वेक्षणातून समोर आले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च या संस्थेने 20 जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण केले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे.

पुण्यातील येरवडा, कसबा पेठ- विश्रामबाग, रास्ता पेठ- रविवार पेठ, लोहिया नगर- कासेवाडी, नवीपेठ- पर्वती हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता.
त्यामुळे या भागातील 1664 नागरीकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

तपासणीनंतर केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार या भागातील 51.05 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एंटीबॉडीज आढळून आल्या आहेत.

कोरोनाची पॉझिटिव्ह होण्यात महिला आणि पुरुष असा भेदभाव दिसून येत नसल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. तसेच 52.8 टक्के पुरुषांना तर 50.1 टक्के महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे.

सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव सर्वाधिक आहे. त्याचबरोबर 66 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 32.6 टक्के आहे.

तर 51 ते 65 वयोगटातील लोकांमधे हे प्रमाण सर्वाधिक असून ते 50.0 टक्के इतके आहे. कोरोनाचा सर्वाधिक 56 ℅ ते 62 % फैलाव हा चाळीत किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.