Pune : अमेझॉनचे गिफ्ट लागल्याचे सांगत महिलेची 53 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – अमेझॉनचे गिफ्ट लागल्याचे संगग महिलेची तब्बल 53 हजारांची ऑनलाइन माध्यमातून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ही फसवणूक 15 नोव्हेंबर 2018 ते 16 नोव्हेंबरब2018 या कालावधीत करण्यात आली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेस एक भाग अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि त्याने आपण अमेझॉनमधून बोलत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने महिलेस तुम्हाला गिफ्ट लागले आहे, असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती काढून त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने तब्बल 53 हजार 16 रुपये काढून घेतले आणि महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.