Pune : शहरात कोरोनाचे 531 नवीन रुग्ण; कोरोनामुक्त 202 रुग्णांना डिस्चार्ज, 13 जणांचा मृत्यू

531 new patients of corona in the city; Discharge of corona-free 202 patients, 13 deaths

एमपीसी न्यूज – कोरोनाचे गुरुवारी 531 नवे रुग्ण आढळले. 202 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 10 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.

शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये 316 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 63 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत 8 हजार 302 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 558 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आता कोरोनाचे एकूण 14 हजार 185 रुग्ण झाले आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5 हजार 325 आहे. आज कोरोनाच्या 3 हजार 453 चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

सिंहगड रस्त्यावरील 76 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, नवी पेठेतील 53 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, मॉडेल कॉलनीतील 87 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, रविवार पेठेतील 49 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 59 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 78 वर्षीय महिलेचा AICTS हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तसेच भवानी पेठेतील 43 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, गणेश पेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, दत्तवाडीतील 56 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, पर्वती दर्शनमधील 87 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 73 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, हडपसरमधील 60 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, पर्वती दर्शनमधील 70 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.