Pune Teachers constituency : पुणे शिक्षक मतदार संघात दुपारी दोन पर्यंत 54.03 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांसाठी आज (मंगळवारी, दि. १) मतदान होत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत पुणे विभागात 54.03 टक्के मतदान झाले आहे.

सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 11.38 टक्के मतदान झाले. तर दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढून 26.25 एवढी झाली. तर दुपारी दोन वाजेपर्यंत ही टक्केवारी 54.03 टक्के एवढी झाली.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पाच जिल्ह्यात 45 हजार 194 पुरुष तर 27 हजार 327 महिला मतदार आहेत. त्याचबरोबर 24 तृतीयपंथी शिक्षक मतदार आहेत. यातील 27 हजार 621 पुरुष तर 11 हजार 571 महिला मतदारांनी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदान केले आहे. एकूण 72 हजार 545 शिक्षक मतदारांपैकी 39 हजार 194 शिक्षक मतदारांनी दोन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

दुपारी दोन वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे. एकूण 54.03 टक्के मतदान झाले आहे.

जिल्हावार झालेले मतदान –
पुणे (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 15807 – 8514
महिला – 16371 – 5976
तृतीयपंथी – 23 – 2
एकूण – 32201 – 14492 (45 टक्के)

सातारा (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 5121 – 3135
महिला – 2589 – 1216
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 7711 – 4351 (56.43 टक्के)

सांगली (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 4826 – 2893
महिला – 1986 – 1011
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 6812 – 3904 (57.31 टक्के)

सोलापूर (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 10561 – 6798
महिला – 3023 – 1434
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 13584 – 8232 (60.66 टक्के)

कोल्हापूर (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 8879 – 6281
महिला – 3358 – 1934
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 12237 – 8215 (67.13 टक्के)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.