Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 54.53 टक्के पाणीसाठा

ही आकडेवारी आज, शुक्रवारी सकाळी 6 पर्यंत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. : 54.53 per cent water storage in dams supplying water to the city

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या 54.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला 1.69 टीएमनसी (85.53टक्के), पानशेत 6.40 टीएमसी (60.07 टक्के), वरसगाव 6.52 टीएमसी (50.85 टक्के), टेमघर 1.29 टीएमसी (34.86 टक्के) या चारही धरणांत एकूण 15.89 टीएमसी म्हणजेच 54.53 टक्के पाणीसाठा आहे.

ही आकडेवारी आज, शुक्रवारी सकाळी 6 पर्यंत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

गेल्या वर्षी आजच्या दिवशी ही धरणे 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के भरली होती. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा आता 50 टक्क्यांहून जास्त झाला आहे.

सोमवारी (3 ऑगस्ट) रात्रीपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने आज उघडीप दिली. सोमवारपर्यंत चारही धरणांत केवळ 9. 82 टीएमसी एवढा पाणीसाठा होता.

आता खडकवासला धरणात 85. 53 टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणाची क्षमता खूपच कमी आहे. त्यामुळे हे धरण लवकर भरते.

गुरुवारी सकाळपर्यंत धरण क्षेत्रात संततधार सुरूच होती. त्यामुळे या धरणातून मुठा उजवा कालव्यातून 300 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते.

पण, धरण क्षेत्रातील पावसाने उघडीप दिल्याने हा विसर्ग थांबवण्यात आला आहे. हे धरण 100 टक्के भरले तरच मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.