Pune : जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान; शहरात 50 टक्के मतदान

रात्री 12 वाजेपर्यंत अंतिम आकडेवारी येणार असल्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 66 टक्के तर, शहरी भागात सरासरी 50 टक्के मतदान झाले आहे. मात्र, रात्री उशिरा अंतिम आकडेवारी येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. शहरी भागात मतदानाला सकाळपासूनच निरुत्साह होता. तर, ग्रामीण भागात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आला. 24 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. आज रात्री उशिरापर्यंत ‘ईव्हीएम’ सील करण्याचे काम सुरू होते.

शिवजीनागरमध्ये आज सकाळी 4 वाजता शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे विद्याभावन स्कुल येथे मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान पार पडले. पिंपरी गावात बोगस मतदार असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, चौकशीत त्यात तथ्य आढळले नाही. वडगावशेरी आणि पिंपरी मतदारसंघांत उमेदवारांना मतदान करीत असल्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला, नेमका तो कोणत्या मतदान केंद्रावर आहे, ते सांगता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे कॅन्टोन्मेंट – 43%, शिवाजीनगर -44, कोथरूड-47, वडगाव शेरी -50, पर्वती -48, हडपसर-47, भोसरी – 59, पिंपरी- 51, चिंचवड – 53, खडकवासला – 51, कसबा पेठ -52

कसबा मतदारसंघांत मतदान कमी!
कसबा मतदारसंघांत नेमके मतदान का कमी झाले? याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनाही देता आले नाही. दोन दिवस झाले पाऊस सुरू आहे. रविवार आणि सोमवार लागोपाठ सुट्टी आल्याने बरेच पुणेकर बाहेरगावी गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.