Pune: संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे आयोजित शिबीरात 568 जणांनी केले रक्तदान

Pune: 568 people donated blood in the camp organized by Sant Nirankari Charitable Foundation याच प्रकारचे रक्तदान शिबीर भविष्यात पुणे जिल्ह्यात होणार असल्याची माहिती मंडळाद्वारे देण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे पुणे जिल्ह्यामध्ये मे महिन्यापासून 19 जुलै पर्यंत 8 रक्तदान शिबीर पार पडली. या रक्तदान शिबिरांमध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी जवळपास 568 युनिट रक्त संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून पुणे झोन मधील चाकण शाखेत 72, हडपसर 67, जय जवान नगर 84, पेरणे फाटा 57, आव्हाळवाडी 91, नानगाव 97, तर 19 जुलै रोजी झालेल्या शिबिरात आण्णापूर शाखेत 63 युनिट, सांगवीत 37 युनिट रक्त संकलन करण्यात आले.

पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली व ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार ही रक्तदान शिबिर आयोजित केली जात आहेत.

कोरोना विषाणूने महाराष्ट्रात थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या आहेत. या परिस्थितीचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे.

ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. रक्तदान शिबिरात प्रशासन डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच, सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

याच प्रकारचे रक्तदान शिबीर भविष्यात पुणे जिल्ह्यात होणार असल्याची माहिती मंडळाद्वारे देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.