Pune : बारावीच्या पहिल्या पेपरला राज्यभरात 58 गैरप्रकांराची नोंद, पुण्यात 15 गैरप्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज  – राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेला ( Pune)  काल (बुधवार) पासून सुरुवात झाली आहे. पहिला पेपर हा इंग्रजी या विषयाचा होता. य़ा पहिल्या पेपरला संपूर्ण राज्यात मिळून 58 गैरप्रकारांची नोंद कऱण्यात आली आहे. त्यापैकी 15 गैरप्रकार हे पुणे विभागात उघडकीस आले आहेत.

Pimpri : विक्रम नढे पाटील यांची जगातील पहिल्या तरंगत्या राष्ट्रीय उद्यानाच्या जिल्हा वन अधिकारी पदी नेमणूक

राज्य मंडळातर्फे 21  फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तसेच 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच मुलांना परिक्षेचे दडपण येवू नये यासाठी महामंडळातर्फे मुलांचे व पालकांचे समोपदेशन देखील दिले जात आहे. तरी देखील काही विद्यार्थी हे गैर मार्गाचा वापर करत आहेत.

गैरप्रकारांची आडकडेवारी पुढील प्रमाणे-

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतील पाच विभागीय मंडळांमध्येच गैरप्रकारांची नोंद झाली आहे.राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक गैरप्रकार हे छत्रपती संभाजीनगर येथे झाले असून तेथे 26 प्रकरणे नोंद कऱण्यात आली आहेत. पुणे विभागात 15,   नागपूर विभागात 1, नाशिक विभागात 2, , लातूर विभागात 14 गैरमार्ग प्रकरणांची नोंद झाली.

जिल्हा स्तरावरही स्वतंत्रपणे भरारी पथके परीक्षा केंद्रांना भेट देणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. तसेच परीक्षेदरम्यान राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर झालेल्या गैरप्रकारांची माहिती राज्य मंडळाकडून संकलित करण्यात ( Pune)  येते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.