Pune : कोरोनाचे 595 नवीन रुग्ण; 331 जण कोरोनामुक्त, 14 जणांचा मृत्यू

595 new patients of corona; 331 coronated, 14 death

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज, शुक्रवारी कोरोनाच्या 595 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी 331 जण कोरोनामुक्त होऊन ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनामुळे आज 14 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 8 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे.

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाचे 330 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 67 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 8 हजार 633 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 572 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची ॲ क्टिव्ह रुग्णसंख्या 5 हजार 575 आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 780 इतकी झाली आहे.

दांडेकर पूल परिसरातील 55 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, लोकमान्यनगरमधील 89 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 75 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 62 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 60 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, आंबेगाव पठारमधील 72 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तसेच औंधमधील 48 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, जनता वसाहतमधील 74 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 62 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, एनआयबीएम रोड भागातील 69 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, कोंढाव्यातील 55 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रस्त्यावरील 93 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 64 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, रामटेकडी हडपसरमधील 37 वर्षीय पुरुषाचा सासून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.