Pune : ससून रुग्णालयात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

6 died of corona at Sassoon Hospital

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयात सोमवारीही 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत या रुग्णालयात 139 जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर, 139 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मृतांमध्ये नाना पेठेतील 58 वर्षीय पुरुषासह, खराडीतील 79 वर्षीय, फुरसुंगीतील 68 वर्षीय, घोरपडीतील 62 वर्षीय, कोंढाव्यातील 70 वर्षीय आणि येरवड्यातील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, श्वसनाचा, हृदयाचा आजार, किडनीचा आजार, मधुमेह असे अनेक आजार होते.

पुणे जिल्हयात 5 हजार 899 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 998 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार623 आहे. कोरोनाबाधित एकूण 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्ह्यात आज कोरोनाचे 283 रुग्ण वाढले. दरम्यान, रविवारी कोरोनाचे पुणे शहरात 4 हजार 782 रुग्ण झाले आहेत. 31 मेपर्यंत 5 हजारांच्या पुढे रुग्ण जाणार असल्याचा अंदाज महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सध्या कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

आतापर्यंत 278 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असले तरी या रुग्णांना इतरही आजार असल्याचे सामोरे आले आहे. विशेषतः जेष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.