Pune- दिल्लीतील आरोपीकडून तब्बल 64 लाखांचे बिटकॉइन्स जप्त; सायबर सेलची कामगीरी

एमपीसी न्यूज – पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बिटकॉइन गुन्ह्याप्रकरणी सायबर सेलने तपासादरम्यान दिल्लीतील एका आरोपीकडून  64 लाखांचे 451 बिटकॉइन्स जप्त केले आहेत.

ओमप्रकाश बागला असे दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेन बिट कॉइन कंपनीत बिटकॉइन गुंतवल्यास त्यावर चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे शहर सायबर सेलचे पथक करत असून आत्तापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी 5 नोव्हेंबरला 4 हजार पानांची चार्जशीट शहरातील 9 जणांविरूद्ध दाखल करण्यात आली. दिल्लीतील ओमप्रकाश बागला या आरोपीच्या बिटक्वॉईन कॅश व्हॉलेट एड्रेसमधून फॉरेन्सिक ऑडिटर यांच्या मदतीने हे बिटकॉइन जप्त करण्यात आले आहेत.

ओमप्रकाश बागला याच्याकडून जप्त केलेल्या बिटकॉइनचे फॉरेन्सिक अॅनालिसिस केले असता त्याची किंमत 64 लाख इतकी असल्याचे समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.