Pune : जम्मू-काश्मीरचे पुण्यात शिकणारे 65 विद्यार्थी आणि 15 कामगार रवाना

Pune: 65 students and 15 workers from Jammu and Kashmir left from Pune to thier home town

एमपीसी न्यूज – पुणे येथे शिकणारे जम्मू-काश्मीरचे 65 विद्यार्थी आणि 15 नागरिकांना आज, मंगळवारी (दि. 13) पाठवण्यात आले आहे. या 80 जणांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्या आहेत. तिथून पुढचा प्रवास हे सर्वजण रेल्वेने करणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी यांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी नीता शिंदे आणि समन्वय सहायक विवेक जाधव यांनी जम्मू काश्मीर येथील विद्यार्थी व नागरिकांना पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या नागरिकांकडून हमीपत्र भरून घेणे, आरोग्य तपासणी करणे याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. तीनही बस रवाना करण्यापूर्वी सर्वांना फूड पॅकेट, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिगचे पालन, मास्कचा वापर या सर्व बाबींचा अवलंब करण्याच्या सर्व प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत.

नागपूर येथून जम्मू काश्मीरकडे एक रेल्वे जाणार आहे. त्यामध्ये पुण्यातील या 80 जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पुणे ते नागपूर आणि तिथून पुढे रेल्वेने प्रवास होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.