Pune : 65 वर्षाच्या वृद्ध महिलेने जिंकले ‘मिसेस इंडिया एमपॉवर्स 2023 विजेतेपद’

एमपीसी न्यूज –  ‘मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स 2023’ चा किताब  65 वर्षाच्या चिरचरूण ( Pune ) अशा डॉ. शुभांगी परब यांनी पटकावला. डॉ. शुभांगी यांनी 4 दिवसीय सौंदर्य स्पर्धेच्या  ‘मिसेस इंडिया एमपॉवर्स 2023’  विजेतेपद जिंकून  एक आदर्श दाखवून दिला. स्पर्धेत 12 – 13 वर्षांच्या मुलींपासून 65 वर्षांच्या आजीबाईंनी सहभाग घेत जो कॉन्फिडन्स दाखवला तो वाखाणण्या जोगा होता.

Hinjawadi : गणेश विसर्जनानिमित्त हिंजवडी मधील वाहतुकीत बदल

महिला साक्षमीकरणसाठी आयोजित “मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स 2023” या स्पर्धेचा ग्रँड फिनॅले पुणे येथील दि ऑर्किड हॉटेल येथे पार पडला. या स्पर्धेमध्ये 5 महिला संचालक पदावर होत्या .ॲडवायझर डॉ. संगीता गायकवाड, नॅशनल पेजंट को-ऑर्डिनेटर नेहा रोकडे, ब्रॅण्डिंग पार्टनर नूतन जाधव या आहेत.या स्पर्धेमध्ये अमृता खानविलकर यांची खास उपस्थिती होती.

महिला सक्षमीकरणासाठी डॉ. भारती पाटील प्रस्तुत “मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स 2023” दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या द्वारे समर्पित हि स्पर्धा नॅशनल पेजंटचे सर्व नियम पाळून चार दिवसांसाठी आयोजित ( Pune ) करण्याल आली होती.

या स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्ये म्हणजे या सौंदर्य स्पर्धेने महिला सक्षमीकरणावर भर दिला. या स्पर्धेच्या मंचावर महत्त्वाच्या भूमिका साकारणारऱ्या व्यक्ती या मोठ्या प्रमाणात महिलाच होत्या.

डायरेक्टर पॅनेलवर सर्व  महिला होत्या.  ही स्पर्धा चार दिवसांची होती. यामध्ये ग्रुमिंग सेशन, टॅलेंट राऊंड, ब्रायडल, गोल्डन सिक्वेंस राऊंड घेण्यात आले.

या स्पर्धेचे एकूण 4 टायटल होते,  ‘टिन, मिस, मिसेस आणि एम एस.’ स्पर्धेच्या ऑडिशनच्या वेळी ‘गिनिज बुक’च्या टीमला  विशेष निमंत्रण होतं आणि फिनॅलेमध्ये देखील त्यांनी त्यांची विशेष उपस्थिती दर्शवून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे कौतुक ( Pune ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.