Pune : पुण्यात 672 रुग्णांची कोरोनावर मात; 640 नवीन रुग्ण, 21 जणांचा मृत्यू

672 patients overcome corona in Pune; 640 new patients, 21 deaths:विशेष म्हणजे आज नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळाले.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात  तब्बल 672  रुग्णांनी मंगळवारी कोरोनावर विजय मिळवला. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच दिवसभरात 640 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर, 21 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे आज नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळाले.

पुणे शहरात आता कोरोनाचे 23 हजार 21 रुग्ण झाले आहेत. यात 385 क्रिटिकल रुग्ण असून, 63 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत 14 हजार 411 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 751 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

सध्या शहरात 7 हजार 859 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

गुरुवार पेठेतील 60 वर्षीय पुरुषाचा जोशी हॉस्पिटलमध्ये, कोरेगाव पार्कमधील 74 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, बावधनमधील 75 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 61 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 61 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

बिबवेवाडीतील 70 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, सोमवार पेठेतील 89 वर्षीय महिलेचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 76 वर्षीय पुरुषाचा, बोपोडीतील 41 वर्षीय पुरुषाचा, भवानी पेठेतील 55 वर्षीय पुरुषाचा व हडपसरमधील 78 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 71 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तसेच पर्वतीमधील 55 वर्षीय महिलेचा व येरवड्यातील 42 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, घोरपडी पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रस्त्यावरील 55 वर्षीय महिलेचा व एरंडवनामधील 39 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रस्त्यावरील 78 वर्षीय पुरुषाचा व शुक्रवार पेठेतील 79 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, पाषाणमधील 58 वर्षीय पुरुषाचा D. H. औंध हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 63 वर्षीय महिलेचा राव नर्सिंग होममध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.