_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune: पुणे विभागातील 69,221 कोरोना बाधित रुग्ण बरे; एकूण रुग्णसंख्या 1 लाख 10 हजार 791

Pune: 69,221 corona infected patients in Pune division cured; The total number of patients is 1 lakh 10 thousand 791 आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 22 हजार 860 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 69 हजार 221 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 791 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण 38 हजार 645 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 2 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.48 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के इतके आहे, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली.

शनिवारी (दि.1) रात्री 9 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 22 हजार 860 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 10 हजार 791 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

शुक्रवारच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 818 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 819, सातारा जिल्ह्यात 234, सोलापूर जिल्ह्यात 224, सांगली जिल्ह्यात 274 तर कोल्हापूर जिल्ह्यात 267 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील 88 हजार 584 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 58 हजार 318 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 28 हजार 231 आहे.

यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 17 हजार 793, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 729, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील 82, पुणे कॅन्टोंन्मेंट 137, खडकी विभागातील 25 व ग्रामीण क्षेत्रातील 3 हजार 465 रुग्णांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 361, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 377, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील 66, पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 43, व ग्रामीण क्षेत्रातील 157 रुग्णांचा समावेश आहे.

तसेच 808 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 83 रुग्ण असून 2 हजार 84 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 869 आहे. कोरोनाबाधित एकूण 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील 8 हजार 861 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 144 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 215 आहे. कोरोना बाधित एकूण 502 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 726 रुग्ण असून 813 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 836 आहे. कोरोना बाधित एकूण 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील 6 हजार 537 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 862 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 494 आहे. कोरोना बाधित एकूण 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.