Pune: पुण्यात एक तर राज्यात सात नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 193 वर!

एमपीसी न्यूज – राज्यात आज (रविवारी) नवीन सात रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यात मुंबईतील चार व पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 193 झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात कालपर्यंत एकूण 186 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. आतापर्यंत कोरोनाबाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत चार तर पुणे, सांगली व नागपूरमध्ये प्रत्येकी एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडला. या नवीन सात रुग्णांमुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 193 पर्यंत वाढला आहे.

पुण्यात कालपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24 होती. त्यात नवीन एकाची भर पडल्याने ती संख्या आता 25 झाली आहे. त्यापैकी सात रुग्ण बरे झाले झाले असून 18 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  पुण्यातील दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.