Pune: सहा महिन्यांत पुण्यात 74,016 तर पिंपरीत 49,337 वाहनांची नोंदणी; देशात वाहनांची नोंदणीत पुणे अव्वल

Pune: 74,016 vehicles registered in Pune and 49,337 in Pimpri in six months; Pune tops in vehicle registration in the country कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे आणि जूनच्या मध्यामध्ये वाहन विक्री झाली नाही. परंतु अनलॉक 1.0 ची घोषणा केल्यानंतर, वाहन नोंदणी सुरू केली गेली आहे.

एमपीसी न्यूज – पुण्यातील नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवा सोयीस्कर नसल्याने स्वतःची वाहने खरेदी करण्यावर त्यांचा भर आहे. मागील सहा महिन्यांत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात 70 हजारहून अधिक वाहनांची नोंद झाली आहे. पुण्याने लखनऊ, जयपूर, अहमदाबाद आणि कानपूरला मागे टाकत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

परिवहन कार्यालयातर्फे मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 25 जुलै 2020 पर्यंत पुणे (MH 12) कार्यालयात 74,016 आणि पिंपरी (MH 14) परिवहन कार्यालयात 49,337 वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे आणि जूनच्या मध्यामध्ये वाहन विक्री झाली नाही. परंतु अनलॉक 1.0 ची घोषणा केल्यानंतर, वाहन नोंदणी सुरू केली गेली आहे.

जून ते जुलै या कालावधीत पुणे आरटीओकडे 11,000 वाहनांची नोंद झाली आहे. जयपूर (आरजे 14) मध्ये 13,688, लखनऊ (यूपी 32) ने 13,184 आणि अहमदाबाद (जीजे 01) 9114 वाहने नोंदविली आहेत.

सध्या देशात 1,444 आरटीओ कार्यरत आहेत आणि त्यापैकी 1,234 रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या संकेतस्थळ ‘परिवर्तन’ येथे नोंदणीकृत आहेत. संकेतस्थळानुसार आतापर्यंत 83.06 लाख नवीन वाहनांची नोंद झाली आहे. यापैकी 63.58 लाख दुचाकी, 9.75 लाख कार आणि 6.69 लाख व्यावसायिक वाहने आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.