_MPC_DIR_MPU_III

Pune : पुणे विभागातील 75 हजार 812 कोरोना बाधित रुग्ण बरे; एकूण रुग्णसंख्या 1 लाख 17 हजार  215

बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 64.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के : 75 thousand 812 corona infected patients in Pune division cured; The total number of patients is 1 lakh 17 thousand 215

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 75 हजार 812 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 17 हजार 215  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार  328 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 64.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_IV

सोमवारी (दि. 3) रात्री 9 वाजेपर्यंतच्या आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख  99 हजार 788 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 17 हजार 215 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार   499 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 487, सातारा जिल्ह्यात 161, सोलापूर जिल्ह्यात 193,  सांगली जिल्ह्यात 347 तर कोल्हापूर जिल्ह्यात 311 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील 92 हजार 880 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 63 हजार 930 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26  हजार  821 आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 129  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 68.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत  4 हजार 389 रुग्ण असून 2 हजार 218 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार  35 आहे. कोरोनाबाधित एकूण 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील 9 हजार 239 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 439 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 282 आहे. कोरोना बाधित एकूण 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 252 रुग्ण असून 955 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 203 आहे. कोरोना बाधित एकूण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील 7 हजार  455 कोरोना बाधीत रुग्ण असून  3 हजार 270 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 987 आहे. कोरोना बाधित एकूण 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.