Pune Division Corona Update: साडेसात हजार रुग्ण ठणठणीत बरे; पाच जिल्ह्यात 4 हजार 275 सक्रिय रुग्ण

7,566 patients infected with corona cured; 4 thousand 275 active patients in five districts

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 7 हजार 566 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 418 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण 4 हजार 275 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच 245 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.93 टक्के आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

आज (सोमवार, दि. 8) दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, कालच्या (रविवार, दि. 7) बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 204 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 128, सातारा जिल्ह्यात 10, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 19 तर कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 1 हजार 633 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  98 हजार 257 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

तर 3 हजार 376 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 85 हजार 658 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 12 हजार 418 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

पुणे जिल्हयात 9 हजार 651 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 6 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 178 आहे. कोरोनाबाधित एकूण 420 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच 234 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे.

सातारा जिल्हयातील 631 कोरोना बाधीत रुग्ण असून 331 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या  272 आहे. कोरोनाबाधित एकूण 28  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 1 हजार 295 कोरोना बाधीत रुग्ण असून 666 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 514 आहे. कोरोना बाधित एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 161 कोरोना बाधीत रुग्ण असून 90 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 65 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 680 कोरोना बाधीत रुग्ण असून 426 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 246 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.