Pune : PMCARESच्या माध्यमातून महापालिकेला आणखी 8 व्हेंटिलेटर – महापौर

8 more ventilators to the Municipal Corporation through PMCARES - Mayor :PMCARESच्या माध्यमातून महापालिकेला आणखी 8 व्हेंटिलेटर - महापौर

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पीएम केअर्समधून पुणे महापालिकेला आणखी 8 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेकडील एकूण व्हेंटीलेटरची संख्या 21  झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यापूर्वी पीएम केअर्समधून महापालिकेला पीपीई किट, मास्क आणि इतर वैद्यकीय साहित्य प्राप्त झाले आहे. या मदतीबद्दल पुणेकरांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असल्याचे महापौरांनी सांगितले.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करून आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांवर वेळीच उपचारासाठी करण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे मदत केली जात आहे.

पीएम केअर फंड ट्रस्टकडून महापालिकेला आतापर्यंत 21 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. भविष्यात आणखी व्हेंटिलेटर प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. नायडू आणि ससून रुग्णालयात हे व्हेंटिलेटर बसविण्यात आले आहेत.

पुणे शहरात दररोज 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी तर तब्बल 877 रुग्ण आढळले. सध्या दररोज कोरोनाच्या 4 हजारांच्या वर चाचण्या करण्यात येत आहेत.

भविष्यात आयसीयू आणि व्हेंटिलेटर कमी पडण्याची शक्यता महापालिकेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेले व्हेंटिलेटर महत्वपूर्ण आहेत.

भारतात निर्माण झालेले हे व्हेंटिलेटर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात येत आहेत. 31 जुलैपर्यंत कोरोनाचे 40 हजार रुग्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिका उपाययोजना करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.