Pune : शहरात 822 नवे कोरोना रुग्ण; आजपर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या, 19 जणांचा मृत्यू

822 new corona patients in the city; The highest number of patients to Date, 19 deaths कोरोनावर मात केलेल्या 486 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. ससून रुग्णालयात 5  महिन्यांच्या चिमुरड्यासह 75  वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोरोनावर विजय मिळविला आहे.

एमपीसीन्यूज : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. शहरात आज दिवसभरात तब्बल 822 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर कोरोनावर मात केलेल्या 486 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. या शिवाय 19 जेष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, ससून रुग्णालयात 5  महिन्यांच्या चिमुरड्यासह 75  वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोरोनावर विजय मिळविला आहे.

पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज तब्बल 822 रुग्णांचे चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. शहरातील कोरोना रुग्णांचा हा आजपर्यंतचा सर्वाधिक रुग्णसंख्येचा आकडा आहे.

तर कोरोना आजारावर मात केलेल्या 486 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. कोरोनावर उपचार घेत असताना 19  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 18  रुग्ण जेष्ठ नागरिक होते. तर एक रुग्ण 55 वर्ष वयाचा होता. कोरोनासह त्यांना अन्य   आजारही होते.

आज कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये 9  रुग्ण ससून हॉस्पिटलमधील, 561  नायडू आणि महापालिका रुग्णालयातील, तर 252  खासगी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण आहेत.

यातील 308  रुग्ण क्रिटिकल असून 65 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 243  गंभीर असून त्यांच्यावर comorbities /०2 therpy वर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या एकूण 486  रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यात नायडू आणि महापालिका रुग्णालयातील293, ससूनमधील 12 आणि खासगी रुग्णालयातील 181 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाने आज 19  रुग्णांचा बळी गेला आहे.

5 महिन्यांच्या चिमुरड्यासह 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त !

ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ताडीवाला रोडवरील 5  महिन्यांचा मुलगा आणि उच्चरक्तदाबग्रस्त 75 वर्षीय नागरिक कोरोनामुक्त झाले असून ससूनमधून आज एकूण 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like