Pune : पुण्यात 827 नवीन रुग्णांची भर, 808 जणांना डिस्चार्ज; आठ दिवसांच्या बाळासह 18 मृत्यू

827 new patients added in Pune, 808 discharged; 18 deaths, including eight-day-old baby

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, शनिवारी 827 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर कोरोना आजारातून बरे झालेल्या 808 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच कोरोनामुळे पुणे महापालिका हद्दीतील 16 आणि ग्रामीण भागातील 2 अशा एकूण 18  नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये आठ दिवसांच्या बाळाचा समावेश असल्याचे पुणे महापालिका आरोग्य विभागाने कळविले आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार आज, पुणे शहरातील महापालिका, ससून तसेच विविध खासगी रुग्णांलयांमध्ये कोरोनाच्या 827 नवीन रुग्णांची नोंद झाली.

तर कोरोनातून मुक्त झालेल्या 808 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, ससून हॉस्पिटलसह खासगी रुग्णांलयांमध्ये शहरातील 16  आणि ग्रामीण भागातील 2 , अशा एकूण 18  रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका आठ दिवसांच्या बाळाचा समावेश आहे. या बाळावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

कोरोना पॉझिटिव्ह निदान झालेल्या 827 रुग्णांमध्ये 5  जण ससून रुग्णालयातील आहेत. तर डॉ. नायडू आणि महापालिका रुग्णालयातील मिळून 678  रुग्णांचा समावेश आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयातील 144 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यापैकी 461  कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील 64  रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर 397 अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

कोरोनावर यशस्वी मात केलेल्या 808 रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये डॉ. नायडू आणि महापालिका रुग्णालययातील सर्वाधिक 572  रुग्णांचा समावेश आहे. त्याखालोखाल खासगी रुग्णालयातील 217  रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शिवाय ससून हॉस्पिटलमधून 19  रुग्णांनाही घरी सोडण्यात आले आहे.

शहरातील एकूण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 9092 इतकी आहे.शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 12 रुग्ण जेष्ठ नागरिक आहेत. मृतांमध्ये ससूनमधील सर्वाधिक 10 रुग्णांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.