Pune : लता मंगेशकर यांच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त 88 ज्येष्ठ नागरिकांना स्वरलता पुस्तकांची भेट

एमपीसी न्यूज – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त 88 ज्येष्ठ नागरिकांना पुण्यातील रिदम वाघोलीकर या युवा लेखकाने ‘स्वरलता’ पुस्तकांची भेट दिली.

महिला हिंदू अनाथाश्रम, निवारा, मातोश्री वृध्दाश्रम या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना, अनाथ महिलांना लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार (दि. 27) रोजी ‘स्वरलता’ या पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आल्या. यावेळी सुधीर वाघोलीकर, आशय वाघोलीकर, अनु वाघोलीकर, प्रतिक रोकडे आणि चैतन्य येरवडेकर आदी उपस्थित होते.

पुस्तक ग्रामोफोन डिस्कच्या आकारातील हे पहिले पुस्तक असून त्यात संगीत, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे लेख आहेत. रिदम वाघोलीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून रचना खडीकर -शहा अतिथी संपादक आहेत. लतादीदींच्या हस्तेच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.

लता मंगेशकर हे श्रद्धास्थान आहे. कलाकार म्हणून अद्वितिय, अलौकिक आहेत. त्यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करावा, अशी इच्छा त्यांचा चाहता म्हणून होती. या इच्छेपोटी ज्येष्ठांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम केला. सर्वच जण त्यामुळे खूप आनंदित झाले. लतादीदींच्या पुस्तकातील वाचनाने आनंद मिळावा हा उद्देश सफल झाला, असे रिदम वाघोलीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like