Pune : टाटा मोटर्स तर्फे पीएमपीएमएलच्या ताफ्यात महिलांच्या सोयीसाठी सहा 9 एम अल्ट्रा मिडी बसेस

0 1,251

एमपीसी न्यूज – सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती आणण्याच्या आपल्या बांधिलकीला कायम ठेवत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठया व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनीने आज सहा अल्ट्रा ९ एम डिझेल मिडी बसेस दाखल केल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात महिलांच्या सोयीच्या सहा अल्ट्रा ९एम डिझेल मिडी बसेस दाखल करत असल्याची घोषणा केली.

HB_POST_INPOST_R_A

ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) तंत्रज्ञान चालकांना अप्रतिम अनुभव देते. ज्यामुळे बस चालवताना त्यांना थकायला होत नाही. महिला प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन या बसमध्ये फायर डिटेक्शन अॅण्ड सस्पेंशन सिस्टम (एफडीएसएस) यासारख्या सर्वोत्कृष्ट श्रेणीतील सुविधा देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक माहितीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम्स (आयटीएस) देण्यात आली आहे. तसेच, जीपीएसच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक डेस्टिनेशन डिस्प्ले बोर्डही कार्यरत आहेत. म्हणजेच, यावर स्थानकांची माहिती दिली जाईल. यातील इनबिल्ट टेलिमॅटिक्स प्रणालीच्या साह्याने स्टेट ट्रान्सपोर्ट युनिट्सना (एसटीयू) संपर्काच्या अधिक सुविधा मिळतील. त्यामुळे, कार्यचलनातील परिणामकारकता वाढेल आणि गाडीची देखभाल करणे, त्यांचा ट्रॅक ठेवणे या गोष्टी वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीच्या होतील.

  • महाराष्ट्र सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत खास महिला प्रवाशांसाठी या बसेस तयार करण्यात आल्या आहेत. मार्च २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने ३३ मधील उर्वरित २७ बसेस टाटा मोटर्सतर्फे रवान्या केल्या जातील.

ठळक वैशिष्ट्ये :
· टाटा मोटर्सच्या नव्या अल्ट्रा व्यासपीठावर निर्मिती.
· चालकाची दमछाक होऊ नये यासाठी ऑटोमेटड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) तंत्रज्ञानासह डिझाइन.
· सीसीटीव्ही कॅमेरे, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएस), फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टमच्या सुविधा.
· वापरकर्त्यांना गाडीची देखभाल करणे आणि ट्रॅकिंग सोपे सहज शक्य व्हावे यासाठी अत्याधुनिक टेलिमॅटिक्सने सज्ज.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: