Pune : आजीची चेन चोरणाऱ्या चोरट्याला 10 वर्षीय मुलीने दाखवला इंगा..

एमपीसी न्यूज : पुणे शहरात दिवसेंदिवस (Pune) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोनसाखळी चोरांनी देखील शहरात धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात दिवसाला पाच ते सहा अशा घटना घडत असल्याचं समोर आलं आहे.

अशाच प्रकारची घटना शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागात घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 60 वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच असलेल्या 10 वर्षीय नातीने चोरट्यांच्या हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

Pune Crime : मैत्रिणीला मारल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलावर दोघांकडून अनैसर्गिक अत्याचार

ऋत्वी घाग असे या चिमुरडीचे नाव असून तिच्या या धाडसी कृत्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या लता घाग या आजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन नातींसोबत फुटपाथवरून मुलीच्या घरी जात होत्या. त्यावेळी 25 ते 30 वयाचा एक तरुण दुचाकीवरून (Pune) आला आणि त्याने या आजीला पत्ता विचारला. आजी पत्ता सांगत असतानाच चोरट्याने आजूबाजूला पाहत डाव साधत आजीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.