Pune: कारमधून फिरायला जाण्याच्या बहाण्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Pune: A 15-year-old girl was raped under the pretext of going for a drive in a car. हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील धक्कादायक घटना

एमपीसी न्यूज – कारमध्ये फिरवून आणण्याच्या बहाण्याने नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने याप्रकरणी तक्रार दिली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी तालुका हवेली येथे घडली. यवत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा पीडित मुलीच्या ओळखीचा आहे. घटनेच्या दिवशी त्याने पीडित मुलीला फोन करून माझ्या कारमध्ये आपण फिरायला जाऊ असे सांगितले. परंतु पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास तो अल्टो कार घेऊन तिच्या घराजवळ आला. आणि तिला कारमध्ये बसवून फिरून येऊयात असे सांगून घेऊन गेला.

 

आरोपीने आपली कार बोरीयेंदी गावातील घनदाट बांबूच्या जंगलाच्या दिशेने नेली. आणि बांबूच्या घनदाट जंगलात नेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याने तिला पुन्हा घरी नेऊन सोडले.

 

घटनेनंतर पीडित मुलगी काही दिवस प्रचंड तणावात होती. त्यानंतर तिने 24 जुलैला रोजी आई-वडिलांसोबत यवत पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.